‘हिंद दी चादर’साठी २५० जणांची संगत नांदेडकडे रवाना

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. २४ व २५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातून भाविक सहभागी होत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथूनही गुरुद्वारा गुरु सिंग सभा येथून २५० जणांची पहिली संगत रवाना झाली. या संगतला स्थानिक भाविकांनी रवाना केले. आणखी मोठ्या संख़्येने भाविक नांदेड येथे जाणार आहेत. या भाविकांची तेथील निवास, भोजन, विश्रांती, पार्कींग आदी सुविधा करण्यात आली आहे. लंगर सेवेतही योगदान देण्यात आले आहे. सरदार हरिसिंग, सरदार कुलदीपसिंग निर्थ, अवतारसिंग छाबडा, रणजितसिंग मलिक, इंदरजितसिंग छटवाल, हरविंदरसिंग मुछल आदी गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.